स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाले गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश :

0

,सावंतवाड़ी, दि.२१ जानेवारी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले. या परीक्षेत एकूण एकोणीस विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यातील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये, इयत्ता पाचवी मधील कु. हेरंब शामसुंदर नाटेकर, कु. सोहम सचिन देशमुख, कु. श्री तुषार कोरगावर, कु. सायना श्रीराम अळवणी, कु. स्पृहा अमेय आरोंदेकर, कु. अस्मि धीरज सावंत या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच, त्यापैकी ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ या विद्यार्थिनीला गणित प्राविण्य परीक्षेतील पुढील टप्प्यासाठी निवडले गेले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी कौतुक केले.