विद्या विकास मंडळ जामसंडे आयोजित चित्रकले स्पर्धेचा निकाल जाहीर

0

देवगड,दि.२१ जानेवारी
विद्या विकास मंडळ जामसंडे आयोजित कै. निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित स्मरणार्थ . निरंजन निळकंठ दीक्षित पुरस्कृत श्रीराम जीवन चरित्र स्पर्धा २०२४ देवगड तालुकास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या नलावडे सभागृहात प्रमुख अतिथी मान. श्री निरंजन निळकंठ दीक्षित यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रशालेच्या बास्केटबॉल क्रीडांगणाचे भूमिपूजन मान.श्री निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडांगणासाठी त्यांनी वडिलांच्या स्मृत्यर्थ चार लाख रुपयाची बहुमोल देणगी प्रशालेला दिली आहे. विद्या विकास मंडळ जामसंडे चे अध्यक्ष मान.एडवोकेट अजित गोगटे साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्था कार्यवाह प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष. प्रसाद मोंडकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
मान. श्री निळकंठ दीक्षित यांचा सत्कार संस्था अध्यक्ष मान. अजितराव गोगटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. मान.निळकंठ दीक्षित यांनी या स्पर्धा आयोजनामागील पार्श्वभूमी त्यांच्या भाषणातून श्रोत्यांसमोर मांडली.
संस्था अध्यक्ष मान. अजितराव गोगटे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. उल्का जोशी( वाडा )व .संजीव राऊत (जामसंडे ) यांनी काम पाहिले. तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षण श्री सुहास जोशी( देवगड) यांनी केले.
निबंध व चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक गटात प्रथम क्रमांकास १००० /-, द्वितीय क्रमांक ७००/-, तृतीय क्रमांक ५००/- प्रत्येकी. तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक १५००/- द्वितीय क्रमांक १०००/-, तृतीय क्रमांक ७००/- प्रत्येकी अशी भरघोस बक्षिसे देण्यात आली.

निबंध स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे.

प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७वी)
प्रथम क्रमांक- कु.अनन्या मंदार जोशी
अ .कृ .केळकर हायस्कूल वाडा ,
द्वितीय क्रमांक- कु.वेद राजेंद्र जोशी
श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल
तृतीय क्रमांक- कु. समृद्धी सुनील गुरव
श्री.मो. गोगटे हायस्कूल जामसंडे

* माध्यमिक गट इयत्ता ८वी ते १०वी
*प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता केदार भिडे
शेठ म. ग. हायस्कूल देवगड,
*द्वितीय क्रमांक कु.राज्ञी विवेक कुलकर्णी शेठ म. ग.हायस्कूल देवगड.
*तृतीय क्रमांक कु.लोचन मनोहर भगत
श्री मो.गोगटे हायस्कूल जामसंडे .
निबंध स्पर्धा परीक्षण- श्री संजीव राऊत व सौ. उल्का जोशी यांनी केले.

*चित्रकला स्पर्धा निकाल
प्राथमिक गट( इयत्ता ५वी ते ७वी)
*प्रथम क्रमांक कु. हर्ष प्रवीण वाडेकर
अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा
द्वितीय क्रमांक कु. भार्गवी विश्वास चौगुले शेठ म.ग. हायस्कूल देवगड
* तृतीय क्रमांक कु.समृद्धी सुनील गुरव
श्री.मो. गोगटे हायस्कूल जामसंडे.

*माध्यमिक गट ( इयत्ता ८वी ते १०वी)
*प्रथम क्रमांक कु.दिया ग.गावकर ,शेठ म.ग.हायस्कूल देवगड.
* द्वितीय क्रमांक कु. ईशान रो. घरकर
श्री.मो.गोगटे हायस्कूल जामसंडे.
* तृतीय क्रमांक कु.प्रांजली विश्वास कदम ,शिरगाव हायस्कूल शिरगाव.
चित्रकला स्पर्धेचे परीक्षण . सुहास जोशी देवगड यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक .संजय गोगटे यांनी केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा चव्हाण यांनी केले.