योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा

0

कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली दि.२१ जानेवारी(भगवान लोके)

वात्सल्यमूर्ती, परमकृपाळू, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा कणकवलीत २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सर्व भक्तांच्या कल्याणार्थ पहिले चार दिवस ‘परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार’ विधी होणार आहे. तसेच १२० दात्यांचे रक्तदान शिबिर होणार आहे. या उत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते १२.३० श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. २८ जानेवारी ते बुधवार ३१ जानेवारी दरम्यान पहाटे ५.३० ते ८ काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, सकाळी ८ ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महाराज स्वाहाकार, दुपारी १२.३० ते ३ आरती व महाप्रसाद, दुपारी १ ते ४ भजने, सायंकाळी ४ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती होणार आहे. बुधवारी ३१ रोजी सकाळी ९ ते १२ रक्तदान शिबिर होणार असून १२० दात्यांचा
रक्तदान संकल्प आहे. गुरुवार १ फेब्रुवारी रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मदिन आहे. यानिमित्त पहाटे ५.३० ते ८ काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान, सकाळी ८ ते ९ भजने, सकाळी ९ ते ११.३० समाधीस्थानी लघुरुद्र, सकाळी ११.३० ते १२ जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प. भाऊ नाईक, रा. वेतोरे), दुपारी १२ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्म सोहळा, दुपारी १२.३० ते ३ आरती व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची उंट, घोडे तसेच वारकरी सांप्रदाय समवेत शहरातून भव्य मिरवणूक व त्यानंतर आश्रमात आरती होणार आहे. रात्री १२वाजल्या नंतर श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा पौराणिक ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग (व्यंकटेश पद्मावती) होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

विविध कार्यक्रम!

२८ रोजी दुपारी ३.३० ते ६.३० कणकवली शाळा नं. ३ च्या मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७.३० आदर्श संगीत विद्यालयातील बबन कदम यांच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय तबला वादन होणार आहे. सोमवार २९ रोजी सायंकाळी ४ ते ५ सुनील पाडगावकर (रा. मळगाव-सावंतवाडी) यांचा ‘हवा नवा तो सूर’ हा अभंग, नाट्य, भक्तीगीत हा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ५ ते ७.३० धर्मानंद नाईक (रा. धारगळ-पेडणे) यांचा ‘सूर निरागस हो’ कार्यक्रम होणार आहे. ३० रोजी सायंकाळी ४ ते ७.४५ ‘ययाती आणि देवयानी’ हे दोन अंकी संगीत नाटक होणार आहे. ३१ रोजी सायंकाळी ४ ते ७.४५ दशावतारी नाटक होणार आहे.