नगरपरिषेदच्या हद्दीतील सर्व दुकानधारकांना मराठीत पाटया लावण्यासाठी 25 नोव्हेबर अंतिम मुदत

0

सावंतवाडी दि.२१ जानेवारी 
सावंतवाडी नगरपरिषेदच्या हद्दीतील सर्व दुकानधारक व आस्थापने यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व दुकाने आणि आस्थापने यांना मराठीत पाटया लावण्यासाठी 25 नोव्हेबर 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र काही दुकानधारकांनी मुदतीनंतरही मराठीमध्ये पाटया लावलेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर अक्षराचा आकार सुध्दा लहान असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 83 दि. 23/3/2018 महाराष्ट्र दुकाने आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम 2018 च्या अधिसूचना नुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहीणे आवश्यक आहे. परंतु, मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. तथापि, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. अशी तरतूद आहे.

सर्व दुकानधारक व आस्थापना यांनी लवकरात लवकर मराठी पाटया लावणेसंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.