तमाशा लोककला राजाश्रयापासून वंचित- संदेश भंडारे

0

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान तर्फे तमाशा व वारी वरील छायाचित्रांचा स्लाईड शो व संवाद कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली दि .२१ जानेवारी(भगवान लोके)

: तमाशा ही जिवंत कला आहे. आजच्या आधुनिक युगात या कलेले असित्व अबाधित आहे. कारण ही कला सादर करणारे कलावंत आत्मभान व समाजभान ठेवून कला सादर करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. तमाशाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील वाईट कृतींबद्दल समाजप्रबोधन केले जात आहे. सर्वसामान्य रसिक तमाशाचे खरे आश्रयदाते आहेत. तमाशाच्या माध्यमातून राजकीय स्थितीवर प्रबोधनात्मक भाष्य केले जात असून राज्यकर्त्यांवर मिश्लिक टिप्पण्या केल्या जात असल्याने आजपर्यंत कोणत्याही सरकारने या कलेला राजाश्रय मिळावा म्हणून प्रयत्न केलेल नाही, त्यामुळे या लोककलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ नाही, अशी खंत संदेश भंडारे त्यांनी व्यक्त केली.

 

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे संदेश भंडारे यांच्या तमाशा व वारी वरील छायाचित्रांचा स्लाईड शो व संवाद कार्यक्रम प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. भंडारे बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह अँड. ,प्रसन्ना देसाई, प्रा. प्रसाद घाणेकर, मंदार आळवे,शरद सावंत,कार्याध्यक्ष अँड. एन. आर. देसाई,कार्यवाह,शरद सावंत असे करावे दी मान्यवर उपस्थित होते.

संदेश भंडारे पुढे म्हणाले,तमाशामध्ये काम करणारी मंडळी विविध जाती जमातीमधील आहे. त्यामुळे ही बहुजनांची लोककला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशाची विविध अंगे आहेत. या कलेचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून या कलेची माहिती नव्या पिढीला कळावी, याकरिता पुस्तक किंवा डॉक्युमेशन स्वरुपात आणली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तमाशाबद्दल समाजात अनेक गैरसमज असून ते दूर करण्यासाठी प्रबोधनात्मक प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची वारी ही परंपरा आहे. वारी ही एक आनंदीयात्रा आहे. वारीत बंधुता, एकता, सेवा, सहिष्णुताचे दर्शन घडते. अलीकडच्या काळात देशातील विविध प्रांतामध्ये असलेल्या भाषेबद्दल द्वेष पसरविण्याचे काम काही समाजकंटकांकडून केले जात आहे. त्यामुळे या समाजकंटकांना तुम्ही आम्ही वेळीच वेसन घालून प्रत्येक भाषे विषयी सर्वांच्या मनात सहिष्णुता निर्माण केली पाहिजे,असे ते म्हणाले.