काजूला दोनशे रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी

0

सावंतवाडी,दि.२१ जानेवारी
स्वामीनाथन समितीने शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट पिकाला भाव देण्याची शिफारस केद्राला केली होती या समितीची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते त्यामुळे काजू पिकालाही खर्चाच्या दीडपट म्हणजे दोनशे रुपये प्रति किलो भाव द्यावा काजू पिकाला प्रति किलो 127 रुपये करता येतो त्यामुळे काजूला दोनशे रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी आजरा येथे झालेल्या काजू परिषदेत करण्यात आली
दरम्यान शासनाकडे मागितल्याशिवाय मिळत नाही, शेतकऱ्यांची मागणी नसताना तीन काळे कायदे शासनाने शेतकऱ्यांच्यावर लादले होते. याच्याविरोधात एक वर्ष शेतकरी लढा देत होते. त्यांच्या लढ्याला यश येऊन कायदे रद्द करण्यात आले त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांची शासनाला एवढी काळजी असेल तर काजू पिकाला २०० रूपये शासनाने हमीभाव दिलाच पाहिजे यासाठी काजू परिषदेच्या निमित्ताने हा लढा यशस्वी करूया असे मत महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे सचिव कॉ. सुभाष काकुस्ते यांनी मांडले
आछरा. येथील जे. पी. नाईक सभागृहात काजू परिषदेच्या प -मुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी काजूला २०० रूपये हमीभाव मिळालाच पाहिजे असा ठराव परिषदेमध्ये करण्यात आला. श्रमिक शेतकरी संघटनेमार्फत आजऱ्यात काजू उत्पादक परिषद उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके होते

स्वागत थोडिंबा कुंभार यांनी केले. प्रास्ताविकात सर्व श्रमिक संघटना व गिरणी संघटनेचे तालुकाध्यक्ष कॉ. शांताराम पाटील यांनी परिषदेचा उद्देश व हेतू स्पष्ट – केला. यावेळी बोलताना काकुस्ते म्हणाले, गोवा शासनाने काजू बियांना १५० रूपये हमीभाव दिला आहे. याच धर्तीवर वाढलेल्या खतांचा दर व मजूरी व मिळणारे = उत्पन्न याचा विचार करता शासनाने २०० रूपये हमीभाव दिलाच पाहिजे झगडून, एकत्रित, संगठित होऊन आपल्याला हा लढा यशस्वी करायचा आहे.

अध्यक्षीय मनोगतात बावके यांनी एकूण सर्व पिकांच्यावर हमीभाव ठरविलेला नाही. आहे तेच दर शेतकऱ्यांना दिले जातात. पण त्याचप्रमाणात वाढलेल्या खताचा दर २०० टक्केने जादा आहे खरेतर हे शासन शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भाइवंलदारांना सोईचे आहे काजू बी ही जीवनावश्यक वस्तू असून खाद्यामध्ये त्याचा उच्च दर्जा आहे. याची नोंद शासनाने घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतिले. सिंधुदुर्ग येथील शेतकरी डॉ. नितीन माळवणकर यांनी काजू बी च्या संदर्भात सिंधुदुर्ग येथे संघटना झाली असून त्याच धर्तीवर आज आजरेकरांनी ही परिषद घेतली यासाठी आमचे पर्ण सहकार्य राहील व हा लढा एकट्याने न लढता सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत व्यक्त केले शेतकरी प्रभागातदार संघटनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष विलास सावंत यांनी सावंतवाडी दोडामार्ग भागात मोठ्या प्रमाणात काजू पीक घेतले जाते काजूला दर मिळत होता म्हणून अनेक तरुण काजू पीक लागवडीत उतरले आपल्या नोकरी सोडल्या कारण यात फायदा होता परंतु गेले काही वर्षे काजूचा दर 100 ते125 च्या घरात आहे त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य आले आहे ही परिस्थिती पाहता काजूला शासनाने हमीभाव दिला पाहिजे गोव्याचे शासन काजूला हमीभाव देते परंतु महाराष्ट्र शासन देत नाही ही बाब अत्यंत चुकीची आहे महाराष्ट्र शासनाने काजूला हमीभाव द्यावा यासाठी आमची लढाई सुरू आहे आता काजू परिषदेमार्फत लढ्याची व्याप्ती वाढली आहे सर्वांनी संघटित होऊन आम्ही भावासाठी एकत्रित लढा दिला पाहिजे असे सावंत म्हणाले यावेळी सावंत यांनी काजू पिका बाबत सविस्तर विवेचन केले

यावेळी परिषदेचे उद्घाटक कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी गिरणी कामगार हा शेतकरी असून शेतीच्या पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे याच धर्तीवर काजू थी – आजरा, भुदरगड, चंदगड इथल्या शेतकऱ्यांना यासंदर्भात जनजागृती करून ही परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी कॉ. संजय घाटगे यांनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गिरणी कामगारांचे योगदान असून गिरणी कामगार स्वतःच्या अस्तित्वाबरोबरच इतर प्रश्नांवरही सातत्याने लढा देत आहेत. यात आजरा तालुका अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी कॉ. उदय भट, कॉ अतुल दिघे, कॉ विजय कुलकर्णी, चंदगडचे तालुकाध्यक्ष गोपाळ गावडे, यांनी मनोगत व्यक्त केले.