मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा-अध्यक्ष सीताराम गावडे

0

सावंतवाडी दि.२१ जानेवारी
मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा असे सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील हे २० तारीख अंतरवाली सराटी येथून उपोषण स्थळी पोहचण्यासाठी रवाना झाले आहेत,ते सव्वीस तारीखला उपोषण स्थळी पोहचणार आहेत,हे उपोषण कीती दिवस चालेल हे सांगता येत नाही, म्हणून उपोषणाला सुरुवात झाल्यावर एक दोन दिवसात उपोषण स्थळी भेट देऊन,उपोषणात सहभागी व्हावे अशा सूचना अनेक जेष्ठ समाजबांधवांनी व्यक्त केल्या आहेत.
ज्यांना सव्वीस जानेवारी नंतर उपोषणात सहभागी व्हायचे आहे त्यांई वैयक्तिक माझ्याशी *९४२३३०४८५६ व सचिव आकाश मिसाळ 9422562881या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपला सहभाग निश्चित करावा* ही विनंती..जाण्मा येण्याची सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी जास्तीत जास्त मराठा बांधवानी संपर्क साधावा विनंती अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केली आहे.