उद्धव ठाकरे, राऊत यांचे अयोध्या राम मंदिर साठी योगदान काय ? एकतरी पुरावा द्या
*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचे आव्हान
*उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जावून कार सेवा दिली त्यांचा आम्हाला अभिमान
* फडणविस रेल्वेने अयोध्येला गेले आणि ठाकरे हेलिकॉप्टर ने फोटोग्राफी साठ
फोटो;;
कणकवली :
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर राम भक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत,त्यांनी अयोध्येला जाऊन कार सेवा दिली. याचा आम्हाला अभिमान आहे.मात्र सातत्याने राम मंदिरावर टीका करणारे,भाजप नेत्यांवर आणि कार सेवकांवर बोलणारे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांचे अयोध्या राम मंदिर साठी योगदान काय ? या दोघांच्या योगदानाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राची जनता विचारत आहे. एक तरी पुरावा उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांनी कार सेवा केल्याचा द्यावा.असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.
अयोध्येकडे राम मंदिराच्या आंदोलनासाठी तसेच कार सेवेसाठी जात असतानाचा एक फोटो उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट केला आहे. त्यातून परत एकदा शिक्कामोर्तब करून दाखवला आहे की, देवेंद्र फडणवीस हे प्रखर राम भक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जिथे बाबरीचा कलंकीत ढाचा कार सेवकांनी तोडून तिथे भव्य अस राम मंदिर उभं केलं आहे, त्याचा फोटो ट्विटर वर पोस्ट केलेला आहे. आम्हाला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करत आहोत. त्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटत आहे. आता जसा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे, तसेच फोटो उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का ? राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी झालेले होते असा एक तरी फोटो,पुरावा दाखवू शकतात काय ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, संजय राजाराम राऊत सामना पेपर चा पगारी कामगार म्हणून कोर्टात केस साठी उपस्थित होता. सामना मधून पगार मिळाला नसता तर तिथे कोर्टामध्ये संजय राऊत हजर झाला नसता. पगार घेऊन कोर्टामध्ये हजर होणे आणि रामभक्त व हिंदू म्हणून अयोध्येमध्ये जाणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
त्या काळात रेल्वेच्या माध्यमातून जाण्याची सोय नागरिकांना होती. तुझ्या मालकासारखं इकडे – तिकडे फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध नव्हते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तेव्हा रेल्वेचाच मार्ग उपलब्ध होता.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान कोणच नाकारत नाही. पिढ्यान – पिढ्या हे कोरल गेलेल आहे की, राम मंदिराच्या आंदोलनामध्ये हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. त्याला कोणीही चॅलेंज किंवा आवाहन करू शकत नाही. शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान सिंहाचा वाटा आहे .शिस्तीत आणि सरळ हा मुद्दा जर समजून घेतला तर हा मुद्दा देखील संजय राजाराम राऊतला व्यवस्थित पद्धतीने समजेल.
*आमदार नितेश राणे यांचे संजय राऊत उद्धव ठाकरे यांना आवाहन*
नाशिकला प्रदर्शन भरवलं जात आहे. एक फोटो किंवा एक पुरावा उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत चा द्यावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाही. कारण तुमच्या नशिबात रामलल्लाच दर्शन लिहिलेलं नाही. तुम्हाला आमंत्रण पण स्पीड पोस्ट दिलेल आहे. ना प्रभू राम चे दर्शन…. ना आज शिवनेरीवर शिवरायांच दर्शन. शिवनेरीवर जायचं हेलिकॉप्टर आहे त्याची लँडिंग देखील तुम्हाला भेटलेली नाही. त्यामुळे ना रामाने तुम्हाला दर्शन दिलं…. ना शिवरायांनी तुम्हाला बोलावलं, अशा पद्धतीची दलिद्री लोक हा संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आहेत. म्हणून दुसऱ्यांचे पुरावे मागण्या अगोदर तुमचे दोघांचे पुरावे अगोदर द्या! असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना केले आहे.
*ईव्हीएम फ्रॉड २०१४ मध्ये दिसला नाही का?*
ईव्हीएम फ्रॉड २०१४ मध्ये दिसला नाही का? उद्धव ठाकरेची लायकी नसताना सुद्धा १८ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. आता विजयाची शास्वती नसणार म्हणून ईव्हीएम फ्रॉड वाटतात, असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकित कुठच्या पक्षाच चिन्ह असत का ? याचा अभ्यास संजय राऊत यांनी करावा. मगच ईव्हीएम मशीन बाबत वक्तव्य करावे. नाशिक सभेत सगळे जिवंत मुडदे असणार आहेत. ज्यांनी एक चुकून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली नाही मग तो उद्धव ठाकरे असेल संजय राऊत असेल अनिल परब असेल यांनी साधी ग्रामपंचायत ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक पण लढवली नाही. त्यांनी पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवावी मगच दुसऱ्यांवर टीका करावी.