कारिवडे-पेडवेवाडी हनुमान मंदिर येथे आज धार्मिक कार्यक्रम

0

सावंतवाडी ,दि.२१ जानेवारी

अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपुर्ण देशभरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर कारिवडे-पेडवेवाडी हनुमान मंदिर येथे आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी
सकाळी १०.०० वा. श्री देव हनुमान मुर्तीवर अभिषेक तसेच रामरक्षा स्त्रोत पठण व मारुती स्त्रोत पठण. दुपारी १२.०० वा. महाआरती व तीर्थप्रसाद. सायंकाळी ७.०० वा. दिव्‍यांच्या रोषणाईत भव्‍य दिपोत्स्व. रात्री ८.०० वा. स्थानिक ग्रामस्थांची भजने इ. दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यानिमित्त मंदिरात साफसफाई, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने संपुर्ण परिसरात भक्तीमय वातावरण पसरले आहे. तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जय हनुमान मित्रमंडळ देवस्थान कमिटी व कारिवडे ग्रामस्थांनी केले आहे.