युवासेना पुरळ विभाग प्रमुख पदी जितेश जाधव व पुरळ शाखाप्रमुख पदी जयदीप तिर्लोटकर तर पडवणे शाखाप्रमुख पदी स्वप्निल शिर्सेकर यांची नियुक्ती*
देवगड तालुक्यात खासदार राऊत यांनी केलेल्या विकासकामांमुळे गावाकऱ्यांनी दिली “विजयाचा हमी”*
देवगड ,दि.२१ जानेवारी
* देवगड तालुक्यातील पावणाई, वाणीवडे, मोडपार,मोंड, पुरळ, पडवणे, फणसे, नाडण गावात युवासेनेच्या माध्यमातून गावादौऱ्या च्या बैठका संपन्न झाल्या. युवासेनेच्या गावदौऱ्याला गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात गावातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला व रिक्त जागी शाखाप्रमुख व विभागप्रमुख यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या युवासेना पुरळ विभाग प्रमुख पदी जितेश जाधव व पुरळ शाखाप्रमुख पदी जयदीप तिर्लोटकर तर पडवणे शाखाप्रमुख पदी स्वप्निल शिर्सेकर यांना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गावातील समस्यांच्या देखील आढावा घेण्यात आला व गावाकऱ्यांनी केलेल्या मागण्या खासदार विनायक यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण करू असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख नाईक यांनी दिला. यावेळी गावातील नागरिकांनी खासदार विनायक राऊत यांना मताढिक्याने निवडून आणण्याचा एक मतांने विश्वास दाखविला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत सचिन सावंत, युवासेना जिल्हा समन्व्यक राजू राठोड, युवासेना तालुका प्रमुख फरीद काझी,संजय देवरुखकर, रमा राणे, सुनील तेली, संदीप डोलकर, अभय बापट आदी मान्यवर तसेच दिनेश लाड, प्रितेश लाड, देवेंद्र लाड,आदित्य दळवी,जयप्रकाश लाड, महेश सावंत,ज्ञानदेव करंजे, अजित मुळम, राजन मुळम, जयदीप तिर्लोटकर, संदीप राघव, अनिल मुळम, संदीप साटम, महेश मुळम,मालोजी पुजारे उमेश शिंदे, रघुनाथ मुळम, दयानंद राघव, अनंत शिर्के,संदीप डामरे,विलास वाडेकर, स्वप्निल शिर्सेकर,गुरुदत्त शिर्सेकर,अमर वाडेकर,बाजीराव जाधव,निवृत्ती वाडेकर,महेश जाधव,दीपक गावकर, सतीश थोटम,अमित फणसेकर, योगेश गावकर,दीपक कोतेकर, संतोष गावकर, मनोहर पुजारे, राजू सुतार,विश्वास घाडी, श्रीधर शिंदे, शरद घाडी, संजय घाडी,मिलिंद पुजारे आदी गावातील शिवसैनिक उपस्थित होते.