अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अभिषेक सावंत

सावंतवाडी दि.२१ जानेवारी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी अभिषेक सावंत तर जिल्हा उपाध्यक्ष परी सिताराम गावडे यांनी निवढ जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत यांननी जाहीर केली.

यावेळी अभिषेक सावंत, प्रसाद राऊळ,पुंडलिक दळवी,प्रशांत ठाकुर, अविनाश राऊळ,सीताराम गावडे, प्रसाद परब, लक्ष्मण पाटकर, आनंद नाईक,बाळकृष्ण नाईक, मनोज घाटकर, विशाल सावंत,संदीप गवस, शिवदत्त घोगळे, अनिल ठिकार, संजय लाड, विजय देसाई,, सुधीर राऊळ, आनंद राऊळ, आनंद धोंडसंतोष सावंत आदी उपस्थित होते

अँड सुहास सावंत म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत या आंदोलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांचा पाठिंबा असून प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातून दोन गाड्या या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा आपला प्रयत्न आहे मराठा आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुंबईमध्ये आता सर्वजण जाऊ असे त्यांनी सांगितले
नवीन तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत म्हणाले मराठा बांधवांना एकत्रित करून सर्वांच्या सर्वांच्या मनातील विचारांना प्राधान्य देऊ तसेच संघटना बळकट करताना विविध प्रश्नावर देखील न्याय मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहील
यावेळी सिताराम गावडे म्हणाले विचारले तालुका अध्यक्ष म्हणून विविध प्रश्नावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तसेच या दरम्यान आमच्यावर काही मंडळींनी कारवाई करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र आम्ही त्याला जुमानजी नाही आणि या बाबतीत आम्ही सहज आवाज उठवला मराठा बांधवांना एकत्र करून न्यायासाठी आपण प्रयत्न करू यावेळी पुंडलिक दळवी यांनी प्रास्ताविक केले