आंतर महाविद्यालयीन क्रिकेट झोन चार या स्पर्धेमध्ये मुलींच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने जे. एस. एम कॉलेज अलिबाग या संघाविरुद्ध विजय

मालवण,दि.२१ जानेवारी

मालवण बोर्डिंग मैदान येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट झोन चार या स्पर्धेमध्ये मुलींच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने जे. एस. एम कॉलेज अलिबाग या संघाविरुद्ध विजय मिळविला होता. या विजयी संघातील ८ विध्यार्थिनींचे स्पोर्ट्स पव्हेलीयन सांताक्रूझ मुंबई येथे होणाऱ्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी या विध्यार्थिनींचा कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मागील महिन्यात मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय मिळविणाऱ्या स. का. पाटील महाविद्यालयाच्या ८ विध्यार्थिनींची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच मुलींची निवड ही आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये झाली असल्याचे जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. हंबीरराव चौगले यांनी दिली. यामध्ये गार्गी जुवेकर, सानिका मेस्त्री, रेणुका मराठे, अमिषा पेडणेकर, मनाली तांबे, पूजा पांढरे, श्रेया अटक, पूजा मायनाक या विध्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. यासाठी विनर्स अकॅडमिचे प्रशिक्षक संदिप पेडणेकर व ज्ञानेश केळूसकर यांनी या संघ उत्तम बनावा यासाठी मेहनत घेतली. विशेष करून या शैक्षणिक वर्षात जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले यांनी खेळाकडे जास्त लक्ष देत विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले.

संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर व सचिव श्री. गणेश कुशे यांनी विध्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी निवड झालेल्या विध्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिमखाना प्रमुख हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. उज्वला सामंत, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. कैलास राबते, बी. एच. चौगुले व इतर उपस्थित होते.