गुटखा,सुगंधी तंबाखूचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी आरोपीला प्रतिबंधात्मक नोटीस

कणकवली दि.२१ जानेवारी(भगवान लोके)

: खारेपाटण शिवाजीपेठेतील घर क्रमांक ५१६ इमारतीखालील गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ५५ हजार ४६० रुपयांचा विमल गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला असा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी अब्दुल गणी हाजीगफार अब्दुल सत्तार मेमन (रा. खारेपाटण शिवाजीपेठ) यांच्यावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू बेकायदेशीररीत्यासाठा करून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदरचा मालही जप्त करण्यात आला होता.

त्यानुसार याप्रकरणाबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी अब्दुल गणी हाजीगफार अब्दुल सत्तार मेमन (रा. खारेपाटण शिवाजीपेठ) याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.