पारवाडी ग्रामस्थांनी केली मंदिर परीसर स्वछता

आचरा दि.२१ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
प्रभू श्रीराम यांच्या पवित्र मुर्ती प्राणप्रतिष्ठापण सोहळ्यानिमित्त रविवार दुपारी पारवाडी ग्रामस्थांतर्फे ब्राम्हण देव मंदिर परीसर स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मंदिर परीसरात वाढलेले गवत काढून मंदिर आणि परीसर धूवून स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत ब्राह्मण देव मंडळ पारवाडीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ, महिला, छोटी मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.