रवींद्र भोवड व विलास हडकर यांच्या हस्ते आयोध्येतून आलेली श्रीराम मूर्ती प्रदान
श्री रामाच्या जयघोषाने हर्षली चिंदर नगरी
आचरा दि.२१ जानेवारी
चिंदर गावातील अनुलोम वस्तीमित्र पत्रकार विवेक(राजू)परब यांना अनुलोमचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास अयोध्येहून मागवलेली प्रभू श्री रामांची धनुर्रधारी मूर्ती सिंधुदुर्ग-रत्नागिरी, अनुलोम उपविभाग जनसेवक रवींद्र भोंवड व कारसेवक विलास हडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
दिंडी काढून भक्ती भावाने रामनामचा जयघोष करीत मूर्ती दत्त मंदिरात आणली गेली.सुहासिनीनी श्री राम मूर्तीचे औक्षण केले. ब्राम्हण करवी पंचोपचारी पुजा करण्यात आली. आरती, महाप्रसाद, हळदीकुंकू भजन असा कार्यक्रम पार पडला.
भाग जनसेवक बाजीराव काळे, उपविभाग जनसेवक रवींद्र भोवड यांनी राम मंदिराचा इतिहास, अनुलोमची माहिती, हिंदूत्वाची आवश्यकता या विषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्राचे वाचन भाग जनसेवक बाजीराव काळे यांनी केले.
यावेळी दामिनी पाताडे, विनिता मसुरकर, मधुकर पाताडे, शमिका पालकर, भूषण दत्तदास, सुनंदा परब, दिनेश पाताडे, विकास पाटील, संपदा पाताडे, हर्षदा परब, नम्रता परब, सुचिता राणे, दिनेश पाताडे, सुखस्वप्ना पवार, श्रीकांत कानविंदे, शंकर पालकर, विनया गोसावी, सुचिता अपराज, वासंती कानविंदे,बाबू परब, विनायक मसुरकर, दत्तू कावले, रवींद्र पवार, प्रभावती पाताडे, सुषमा पाटील, सुचिता अपराज बहुसंख्य महिला वर्ग आदी राम, दत्त भक्त उपस्थिती होते.