अयोध्येत साकारलेले राममंदीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रेय, त्यांच्यामुळे राममंदीर शक्य झाले

0

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुणकेश्वर येथे प्रत{पादन

देवगड,दि.२१ जानेवारी

देशात आजपर्यंत बरेच पंतप्रधान झाले मात्र अयोध्यामध्ये रामलल्लांचे मंदीर साकारण्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जात असून त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुणकेश्वर मंदीर येथे केले. कुणकेश्वर मंदीर येथे धार्मिक स्थळे(मंदीर) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे, आ.नितेश राणे, जिल्हाधीकारी कीशोर तावडे, माजी आमदार अॅड.अजित गोगटे, उपमुख्यकार्यकारी अधीकारी विनायक ठाकूर, तहसिलदार विशाल खत्री, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, देवस्थान टस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, संदीप साटम, बाळा खडपे, एकनाथ तेली, प्रकाश राणे आदी उपस्थित होते.ना.नारायण राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर मंदीरातील नंदी व मंदीर परिसर पाण्याने स्वच्छ करून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ना.राणे यांनी देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे कर्तृत्ववान पंतप्रधान लाभल्यामुळेच जगात अकराव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानावर पोहचली असून चार वर्षांनी तीसऱ्या स्थानावर पोहचून भारत महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अयोध्या येथे साकारलेले श्री रामलल्लांचे मंदीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले.

यावेळी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राममंदीराची जागा बदलली असे विधान करून टीका केली.या टीकेचा ना.राणे यांनी समाचार घेतला.शरद पवार यांना चांगले काहीच बोलता येत नाही.पुण्यवान काम त्यांनी कधीच केले नाही. केंद्रीय कृषीमंत्री, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री अशी मोठी पदे भुषविली मात्र वयाची ८० पार करूनही मोदींवर टीका करण्याचे काम ते करीत आहेत असा प्रहार राणे यांनी केला.

आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वरचा व{कासामध्ये ना.राणे यांचे फार मोठे योगदान आहे जसे महाकाल मंदीर, काशीविश्वेश्वर मंदीर याचा विकास झाला त्याच धर्तीवर कुणकेश्वर मंदीराचा विकास होण्यासाठी ना.राणे यांनी मोठ्या प्रमाणात केंद्राकडून निधी मिळविला आहे असे मत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधीकारी कीशोर तावडे यांनी विचार व्यक्त केले.सुत्रसंचालन रामदास तेजम यांनी केले.