गाडी अडवून दांड्याने मारहाण

लिंगडाळ येथील सचिन लोके याच्यावर गुन्हा दाखल

देवगड ,दि.२१ जानेवारी

वेळोवेळी मारण्याची धमकी देवून आरे फाटा जवळ गाडी अडवून वळीवंडे येथील श{वाजी करपे यांना च{व्याचा दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी देवगड पोलीसांनी लिंगडाळ येथील सचिन शेखर लोके याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी १० वा.सुमारास देवगड निपाणी मार्गावर आरे फाटा जवळ घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार, वळीवंडे पोखरबाव येथील शीवाजी मरगू करपे(४५) यांना सचिन शेखर लोके(३५) रा.लिंगडाळ यांनी वेळोवेळी मारण्याचा धमक्या दिल्या होत्या.रविवारी सकाळी १० वा.सुमारास ते आपल्या गाडीने देवगड नांदगांव मार्गावरून वळीवंडे येथे जात असताना आरे फाटा येथील उताराजवळ सचिन लोके यांनी त्यांचा गाडीच्या समोर आपली गाडी आडवी लावून हाताच्या थापटाने कानाखाली मारली.त्यानंतर गाडीतील चिव्याचा दांडा काढून करपे यांच्या डोक्यात मारल्याने ते एका कुशीवर खाली पडले.त्यानंतर त्यांचा डाव्या पायाच्या पोटरीवर, डाव्या बाजुच्या कंबरेवर, डाव्या हाताच्या पंजावर व कोपरावर दांड्याने मारून दुखापत केली.याप्रकरणी शीवाजी करपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी सचीन शेखर लोके याच्याव{रूध्द भा.द.वि.कलम ३२४, ३२३, ३४१, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडीक करीत आहेत