मालवण व्यापारी संघाचा पदाधिकारी व व्यापारी संघांनी हा एकता मेळावा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली

मालवण,दि.२१ जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा यावर्षीचा व्यापारी एकता मेळावा दिनांक ३१ जानेवारी रोजी मालवणात होत असतानाच मालवण व्यापारी संघाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या व्यापारी एकता मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारलेल्या मालवण व्यापारी संघाचा पदाधिकारी व व्यापारी संघांनी हा एकता मेळावा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. आज या व्यापारी एकता मेळाव्याच्या मंडप उभारणीच्या कामास दणक्यात प्रारंभ झाला तर मालवण शहरात ठिकठिकाणी व्यापारी एकता मेळाव्याचे बॅनर झळकत आहेत.

आज मंडप उभारणी व व्यासपीठ उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, महेश अंधारी, हर्षल बांदेकर, अरविंद ओटवणेकर, महेश कांदळगावकर, रवी तळाशीलकर, अभय कदम, सचिन आरोलकर, हरेश देऊलकर, राजू बिडये, कुलराज बांदेकर, करण खडपे, निहार सापळे, पार्थ वाडकर आदी व इतर उपस्थित होते.