कणकवलीत आ.नितेश राणेंची संकल्पनेतून श्रीरामाची १५ फुटी भव्य-दिव्य प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत श्रीरामाच्या भव्य दिव्य प्रतिकृतीचे अनावरण

कणकवली दि.२२जानेवारी(भगवान लोके)

अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भव्य-दिव्य १५ फुटी श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ. राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून त्या ठिकाणी २२ जानेवारी २०२४ रोजी (आज) श्री रामाच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा क्षण देशातील प्रत्येक हिंदू आणि समस्त नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे ,नगराध्यक्ष समीर नलावडे,विधानसभा मतदार संघ प्रमुख मनोज रावराणे, बँक संचालक विठ्ठल देसाई ,समीर सावंत, बंडू हरणे, जील्हा महीला उपाध्यक्ष राजश्री धुमाळे , शहर अध्यक्ष अण्णा कोदे,मेघा गांगण,समीर प्रभू गावकर,पप्पू पुजारे,संदीप सावंत,महेश तळगावकर,सर्वेश दळवी,शिशिर परुळेकर,संजय कामतेकर,अभी मुसळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ चे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर,उपाध्यक्ष कल्याण पारकर,खजिनदार आनंद पारकर, चेतन मुंज,श्री.डीचोलकर,मनोज हिर्लेकर आदी सह भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवलीतील मध्यावर्ती बसविलेली ही प्रभू श्रीरामाची मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.भगव्या रंगात असलेली ही मूर्ती बलशाली,धनुर्धारी श्रीरामाची प्रतिकृती आहे. २२ जानेवारी हा देशभरात उत्सवाचा, आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने कणकवलीत श्रीराम प्रभूंची पूर्णाकृती थर्माकोल ची मूर्ती उत्सवासाठी उभारण्यात आलेली आहे. या मूर्तीवर करण्यात आलेली प्रकाश योजना डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. धार्मिक आणि सात्विक अशा श्री प्रभू रामाच्या कणकवलीतील आगमनाने आध्यात्मिक वारसा असलेली परमपूज्य भालचंद्र बाबांची कणकवली नगरी भक्तीमय झाली आहे.
दरम्यान २२ जानेवारी रोजी सायंकाळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती,कार सेवकांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर चेंदवणकर दशावतारी नाटक मंडळाचे नाटक होणार आहे.