धम्म म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर कला-प्रा. सुषमाताई हरकुळकर

सावंतवाडी, दि.२२जानेवारी

धम्म आणि धर्म यात फरक असून धम्म म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे, प्रत्येकाने धम्म आचरण केल्यास जीवन निश्चितच सुखकर व आनंददायी होईल असे प्रतिपादन बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका प्रा. सुषमाताई हरकुळकर यांनी रविवारी सावंतवाडी येथे केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमार्फत “महिला उपासिका” कार्यशाळेचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर च्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका उपाध्यक्ष मानसी सांगेलकर या होत्या. यावेळी माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर, तालुका सचिव सुहासिनी तेंडुलकर, ममता जाधव, तालुका अध्यक्ष बुधाजी कांबळे, मिलिंद नेमळेकर, मानसी कदम इत्यादी उपस्थित होते.

बाबासाहेबांनी स्थापन केलेली बौद्ध महासभा ही एकमेव धार्मिक संघटना असून त्या संघटनेची विविध कलमे, अध्यक्ष पद्धत, त्यातील कामकाज, बौद्ध संस्कार प्रचार व पर्यटन इत्यादी विषयावर तपशीलवार मार्गदर्शन केले. तर केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर यांनी धम्माची आचारसंहिता, संस्थेची जडणघडण, प्रबोधनात्मक दृष्टी, संस्थेचा पारदर्शक कारभार कसा करावा इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर प्रभाकर जाधव यांनी बौद्ध महासभेची धार्मिक वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात प्रा. सुषमाताई हरकुळकर यांनी पदाधिकारी व कार्यकारिणी यांची कर्तव्य, विविध पदे, त्यांची कार्यप्रणाली इत्यादी बाबत तपशीलवार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बुधाजी कांबळी यांनी केले. तर स्वागत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी सुषमाताई हरकुळकर, विजय हरकुळकर, मानसी कदम, शिवानी पवार, साक्षी खानोलकर, संचिता जाधव, वैशाली वराडकर इत्यादींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात मला. यावेळी प्रियदर्शनी जाधव, साक्षी खानोलकर, मंगेश कदम, श्रीमती मीनाक्षी तेंडोलकर, रश्मी चौकेकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. शेवटी रश्मी चौकेकर यांनी आभार मानले.