कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातातून साकारली श्रीरामांची भव्य रांगोळी

नऊ फूट बाय सहा फूट आकाराची रांगोळी ठरतेय आकर्षण

सावंतवाडी , दि.२२जानेवारी
कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे अयोध्या रामभूमी श्रीराम लल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम प्रभूंची रांगोळी साकारण्यात आली. प्रशालेचे कलाशिक्षक केदार टेमकर यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक श्रीराम यांची रांगोळी साकारली व विद्यार्थ्यांना रांगोळी या कलेबद्दलची प्रत्यक्ष माहिती दिली.
ही रांगोळी सहा बाय नऊ फूट असून अवघ्या चार तासांमध्ये ही रांगोळी साकारण्यात आली.रांगोळी सजविण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा सडा घालून, पणत्या लावण्यात आल्या आणि रामरक्षा म्हणण्यात आली. हे सर्व साकारत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भक्तिमय आनंद दिसत होता . तसेच रांगोळी पुर्णत्वास साकारत असताना रामभक्तिस स्पर्शाचा विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही उपस्थित राहून याची देही याची डोळा आनंद घेतला.
प्रशालेचे कलाशिक्षक टेमकर सर यांच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी. मानकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक यांचे कडून कौतुक करण्यात येत आहे.