नांदगांव येथील राममंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती

0

रामभक्तांनी केला श्रीरामाचा जयघोष ; सर्वसामान्य रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

कणकवली दि.२२ जानेवारी(भगवान लोके)

नांदगांव दशक्रोशीतील श्रीराम भक्तांच्या वतीने भव्य मिरवणूक व श्रीराम महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त नांदगांव गोसावीवाडी येथील श्रीराम मंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी रामभक्तांनी जय श्री राम , प्रभु रामचंद्र की जय हो चा श्रीराम भक्तांनी केला जयघोष केला .

यावेळी नांदगांव सरपंच भाई मोरजकर , माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, शेतकरी खरेदी विक्रीसंघ संचालक पंढरी वायंगणकर ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके , हर्षदा वाळके,भाग्यलक्ष्मी साटम,आयनल माजी सरपंच बापू फाटक,भालचंद्र साटम,प्रदीप हरमळकर,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर, तोंडवली सरपंच मानली गुरव,सुशील इंदप,बुवा संतोष मिराशी,पंढरी पारकर ,माजी सरपंच शशिकांत शेट्ये, हेमंत परुळेकर,दिलीप फोंडके , रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर ,नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पपी सापळे,कमलेश पाटील ,पत्रकार उत्तम सावंत, ऋषिकेश मोरजकर,संजय डगरे,लक्ष्मण लोके,महेश लोके,रघुनाथ ,राजा म्हसकर आदींसह विविध गावातून आलेले सर्व राम भक्त उपस्थित होते.

श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त नांदगाव येथील श्रीराम भक्तांनी काढलेल्या मिरवणुकीचे व कार्यक्रमाचे कौतुक यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.