कांदंबरी राणे हिने कार्ड बोर्ड पासून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारली

0

सावंतवाडी,दि.२२ जानेवारी
येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलची १२ वी तील विद्यार्थीनी कांदंबरी महेश राणे (रा.खासकीलवाडा ) हिने कार्ड बोर्ड पासून अयोध्येतील राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. अयोध्या येथे होत असलेल्या श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासकीलवाडा मधला आवाट येथील श्री महापुरूष मंदिरात ही प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
दरम्यान , कादंबरी हिच्या या कलाकृतीबद्दल माजी आमदार राजन तेली यांनी या महापुरूष मंदिरात तिचा सत्कार केला. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, गुरु मठकर,मंडळाचे अध्यक्ष अमित भराडी, उपाध्यक्ष अभिजीत गवस, बंटी पुरोहित, केतन आजगांवकर, प्रकाश राणे, अशोक राणे, नाना भराडी, उमेश राणे, अनिल हवालदार, श्रीकांत कुडपे, मंगेश गावडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कांदबरी हिला ही प्रतिकृती साकारण्यासाठी दोन दिवस लागले. कार्ड बोर्ड पासून तिने ही प्रतिकृती साकारली आहे. त्याची रंगरंगोटीही तिनेच केली आहे. तिला चित्रकलेची आवड असून यापूर्वीही तिने अशा प्रकारे चित्रं व प्रतिकृती साकारल्या आहेत. तिच्या या कलाकृतीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.