आचरा,दी.२२ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
राममंदिर प्राणप्रतिष्ठापण सोहळ्यानिमित्त आचरे रामेश्वर मंदिर येथे आयोजित विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आचरा परीसर राममय बनला होता. या कार्यक्रमाची सुरुवात शोभा यात्रेने करण्यात आली. .या शोभायात्रेत आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस ,
शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, उदय घाडी यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या शोभा यात्रेत बालगोपाळ दिंडी मंडळशिवकन्या ग्रामसंघ,सिंधूकन्या,सागरकन्या ग्रामसंघाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.सकाळी आचरा तिठा येथून निघालेली शोभायात्रा आचरा बाजारपेठ मार्गे रामेश्वर मंदिर येथे आणण्यात आली.यावेळी रामघोषाने परीसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन मंदार सांबारी यांनी स्वरचित आणि स्वतः गायलेल्या संगीतबद्ध केलेले रायमगीताचे यावेळी अनावरण करण्यात आले. यानंतर ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी यांनी रामचरीत्र उपस्थितांसमोर प्रस्तुत केले.अयोध्या येथील रामप्रतिष्ठापन सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी रामेश्वर मंदिर येथे स्क्रीन लावण्यात आला होता.दुपारी महाप्रसादानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात दिंडी मंडळांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी वातावरण भक्तिमय बनले होते.