सावंतवाडी,दि.२२ जानेवारी
माझ्या अध्यक्षपदाचा कार्यकालात पतसंस्थेची जी प्रगती झाली व कर्जावरील व्याजाव दर कमी करण्याबाबत जे काही निर्णय घेण्यात आले, त्याचे सर्व श्रेय हे माझ्या सोबतच्या संचालक व कर्मचारी वर्गास जाते. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी आज सिंधुदुर्ग नगरी येथील पतसंस्थेच्या सभागृहात बोलताना केले. जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त अधीक्षक व सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ पतसंस्थेच्या सभागृहात संचालक मंडळ, पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग व माजी संचालक यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाग्यवंत वाडीकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण व उपाध्यक्ष श्रीमती अनघा तळावडेकर यांनी यांचा सन्मान केला. तर संचालक वर्षा मोहिते, राधिका आचरेकर, मनीषा दाभोलकर, मनीषा सुर्वे, यांनी वाडीकर यांच्या पत्नी यांची श्रीफळाने ओटी भरून सन्मान केला. माजी संचालकांच्या वतीने संस्थेचे माजी संचालक राजेंद्र सावंत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाडीकर यांचा सत्कार केला.
भाग्यवंत वाडीकर पुढे म्हणाले, संस्था व्यवस्थित चालवायची असेल तर सर्व संचालकांनी एकमत करून धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव व कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मात्र अती विश्वासही नसावा अशी सूचना त्यांनी केली. पतसंस्थेसाठी अध्यक्ष व संचालकांनी आपला वेळ देणेही गरजेचे आहे. यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी संचालक राजू तावडे, संचालक देविदास आडाळकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण, उपाध्यक्ष श्रीमती अनघा तळवडेकर , संचालक देविदास आडाळकर, प्रकाश आडणेकर, दिनेश खवळे, वंदन गावडे, वर्षा मोहिते, माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी संचालक राजू तावडे, राजू सावंत, ॲड. जयसिंग वारंग, संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर, सदानंद पावसकर, राधिका आचरेकर, मनीषा दाभोलकर, मनीषा सुर्वे, कृष्णा गायचोर, दिगंबर परब आदी उपस्थित होते. प्रस्तावना व स्वागत संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर यांनी केले.
Home आपलं सिंधुदुर्ग पतसंस्थेच्या प्रगतीचे सर्व श्रेय माझे संचालक व कर्मचारी वर्गाचे माजी अध्यक्ष...