कणकवली पटवर्धन चौक येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे श्री रामाची महाआरती…!

0

प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने कनकनगरी दुमदुमली;प्रभू श्री रामाच्या मूर्तीची सोहम वाळके व सिद्धी वाळके या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजन…!

कणकवली दि.२२ जानेवारी(भगवान लोके)

अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाआरती करण्यात आली.
‘जय श्री राम , प्रभू रामचंद्र की जय , ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. आरंभी प्रभू श्री रामाच्या मूर्तीची सोहम वाळके व सिद्धी वाळके या दाम्पत्याने ब्राह्मणांच्या मंत्रोपचारात विधीवत पूजा केली. त्यानंतर रामाच्या मूर्तीचे भक्तांनी दर्शन घेतले. महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या आरतीमध्ये आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश सावंत, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडीच्या तालुका संघटक वैदेही गुडेकर, संजना कोलते, माधवी दळवी, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, उद्योजक रामू विखाळे, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, अनिल हळदिवे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, कलमठ ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, अनुप वारंग, संकेत नाईक, राजू रावराणे, राजू राठोड, तेजस राणे, महेश कोदे, सी. आर. चव्हाण, महानंदा चव्हाण, सुजीत जाधव, रुपेश आमडोसकर, रिमेश चव्हाण, विलास गुडेकर, राजू राणे, गौरव हर्णे, बाबू कोरगावकर, समीर परब, सचिन आचरेकर, वैभव मालंडकर, राजू कोरगावकर, सोहम वाळके, नाना सापळे, बच्चू कांबळे, प्रद्युम मुंज, साई कोदे, सुदाम तेली यांच्यासह रामभक्त सहभागी झाले होते.