कणकवलीत पटकीदेवी मित्रमंडळातर्फे काढण्यात आली शोभायात्रा…!

0

रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्याचे निमित्त;बाजारपेठेतील दुकानदार व घरोघरी लाडूचे वाटप

कणकवली दि.२२ जानेवारी(भगवान लोके)
अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त पटकीदेवी मित्रमंडळातर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा जयघोष करीत वातावरण राममय केले.

रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठनेनिमित्त कणकवली शहर तालुक्यात मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. यानिमित्त शहरातील पटकीदेवी मित्रमंडळातर्फे पटकीदेवी ते पटवर्धन चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान बाजारपेठेतील दुकानदार व घरोघरी लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी जय श्री रामाचा जयघोष करण्यात आला. मंडळातर्फे श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचा चलचित्र देखावा काढण्यात आला. हा देखावा लक्षवेधी ठरला. यामध्ये पटकीदेवी मित्र मंडळाचे युवक सहभागी झाले होते.