जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला

0

भाजपाच्या वतीने नाटळ-सांगवे विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली दि.२२ जानेवारी(भगवान लोके)

प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्ताने नाटळ-सांगवे विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जोरदार श्री राम च्या घोषणा देण्यात आल्या.

भाजप विभागीय कार्यालयात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मारूती मंदिर भिरवंडे, स्वामी समर्थ मठ दिगवळे, हनुमान मंदिर नाटळ व नरडवे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत, विजय भोगटे,बाबू सावंत, विनय सावंत,नाना काणेकर,प्रफुल्ल काणेकर, मयुरी मुंज, राजश्री पवार,अमिता सावंत,विनोद सावंत, राजू पवार,मीनल पवार, भाई सावंतआणि भक्त मंडळी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थित रामभक्तानी जल्लोष साजरा केला. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थितांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले.संध्याकाळी भाजपा कार्यालय कनेडी येथे महा आरती करण्यात आली.