नगर वाचन मंदिर मालवण आयोजित अथर्वशीर्ष पाठांतर व मनाचे श्लोक स्पर्धा : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण,दि.२२ जानेवारी
नगर वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने आयोजित अथर्वशीर्ष पाठांतर व मनाचे श्लोक स्पर्धेत सोहंम समिर गवाणकर व प्रांजल सतीश तेरसे विजेते ठरले. स्पर्धेत शालेय विध्यार्थ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद लाभला.
शालेय स्तरावरील पहिली ते चौथी गटात मनाचे श्लोक तर अथर्वशीर्ष पठण पाचवी ते सातवी अश्या दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन ग्रंथापाल संजय शिंदे, जेष्ठ परीक्षक विनायक कोळंबकर, पत्रकार अमित खोत, ग्रंथालय कर्मचारी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव तसेच पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धेत सोहंम समिर गवाणकर (प्रथम), अस्मि अशोक आठळेकर (द्वितीय), तन्मय हेमंत देसाई (तृतीय) तसेच तन्मय महेश परब व वेदांत श्रीकांत वा्यंगणकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरले.
मनाचे श्लोक पठण स्पर्धेत प्रांजल सतीश तेरसे (प्रथम), रेणुका गुरुनाथ चव्हाण (द्वितीय), पर्णिका प्रताप चिपकर (तृतीय), रुही गणेश मयेकर व सोहम योगेंद्र धामापूरकर यांना उत्तेजनार्थ अश्या प्रकारे सर्व विजेत्यांना परीक्षक विनायक कोळंबकर व अमित खोत यांच्या हस्ते गौरवण्यात आले