गोडकर्स आर्ट अकॅडमीतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0

मालवण ,दि.२२ जानेवारी

गोडकर्स आर्ट अकॅडमी रेवतळे यांच्यावतीने अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात ही स्पर्धा होणार आहे.

यामध्ये गट पहिला – शिशुवर्ग ते चौथी विषय माझी फुलबाग, माझे गाव, कोकणी मेव, गट दुसरा – इयत्ता पाचवी ते सातवी विषय माझी आजी/आजोबा, सिंधुदुर्गातील निसर्ग, माझ्या घरचा गणपती, गट तिसरा – इयत्ता आठवी ते दहावी विषय किल्ला राजकोट व परिसर, मालवण बाजार, नेव्ही डे मालवण, गट चौथा – महाविद्यालयीन व खुला गट दशावतार (दहीकाला), श्रीराम मंदिर अयोध्या, छत्रपती शिवरायांचे आरमार असे विषय देण्यात आले आहेत.

चित्राचा आकार २१ इंच बाय १५ इंच असावा, चित्र पाठविण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी आहे. चित्राच्या पाठीमागे संपुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर व शाळेचे नाव व पत्ता लिहावा, शाळेच्या मुख्याध्यापकांची सही व शिक्का आवश्यक स्पर्धेचा बक्षीस समारंभ २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन येथे होईल. ही स्पर्धा निशुल्क आहे. विनायक गोडकर यांच्या २ मे ते ५ मे या कालावधीत होणाऱ्या चित्रप्रदर्शनात बक्षीसपात्र चित्रांचा सहभाग असेल. स्पर्धेच्या माहितीसाठी संपर्क दिनकर शेटकर ९८६०४३६७६५, शरद धुरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.