सर्वेक्षण करण्यास घरोघरी येणारे अधिकारी कर्मचारी यांना योग्य ती माहीती देवून सहकार्य करावे- मुख्याधिकारी सागर साळुंखे

0

सावंतवाडी,दि.२२ जानेवारी
सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, दि. -२३ जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी सर्वेक्षण करण्यास घरोघरी येणारे अधिकारी कर्मचारी यांना योग्य ती माहीती देवून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.