राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दरम्यान देवगडात राम लल्लाचा जयघोष !

0

ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक आकर्षक चित्ररथ देखावे भव्य रॅली सहभागी

!देवगड (प्रतिनिधी)

अयोध्या येथील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्ताने त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रम करण्याचे आदेश दिलेनंतर सोमवार 22 जानेवारी रोजी देवगड तालुका बऱ्याच विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक आकर्षक चित्ररथ देखावे भव्य रॅली काढण्यात आली होती . सर्वत्र तालुक्यात रामभक्तिमय वातावरण यानिमित्ताने पहायला मिळाले .
देवगड जामसंडे शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती तर जामसंडे येथील दिरबादेवी रामेश्वर मंदिर, नारिंग्रे येथील राम मंदिर, कुणकेश्वर मंदिरात, शिरगाव राममंदिर,पुरळ हुर्शी येथील गणेश मंदिरात रामरक्षा किर्तन महाआरती, महाप्रसाद स्थानिक भजन हळदीकुंकू व दशावतारी नाट्य प्रयोग आधी कार्यक्रम साजरी करण्यात आले होते. मळई येथे देखील हनुमान मंदिरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले.
शिरगाव येथे काढण्यात आलेल्या भव्य शोभा याञेत जय श्री रामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून राममय झाला.
जय श्रीरामच्या जयघोषात , डोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पारंपारिक वेशभूषेत शिरगाव ग्रामपंचायत येथून शिरगाव बाजारपेठेतून शिरगाव रामनगर येथील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायाञा काढण्यात आली.तेथे गेल्यावर राममंदिरात महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात असंख्य रामभक्त सहभागी झालेले होते.