जानवली येथे परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू

0

कणकवली दि .२२ जानेवारी

बिहार येथील मूळ रहिवासी व सध्या जानवली येथे राहणारा विकेशकुमार सत्येंद्र सहानी(२३)याचा रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला.
विकेशकुमार याला दारू पिण्याचे व्यसन होते. रविवारी सायंकाळी तो दारू पिऊन झोपी गेला होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ नितेश सहानी हा त्याला उठवायला गेला. त्यावेळी तो काहीच हालचाल करीत नव्हता.त्यामुळे त्याच्या भावाने व इतर नागरिकांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथील डॉक्टरानी त्याला तपासून तो मृत झाल्याचे सांगितले.त्यानंतर नितेश याने पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तत्काळ दाखल होत घटनेची माहिती घेतली.या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.