दत्तमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे सहभागी

0

वैभववाडी,दि.२२ जानेवारी
अयोध्येतील श्री राममंदिर उद्दघाटन व प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात गावागावात देव देवतांच्या मंदिरात अभिषेक, पूजा आर्चा, महाआरती, भजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी दत्तमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते.तर सायंकाळी संभाजी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीत शहरातील नागरीक सहभागी झाले होते.
तालुक्यात गेले दोन दिवस सगळीकडे जय श्रीराम नावाचा जयघोष सुरु आहे. ठिकठिकाणी मंदिरांवर आकर्षण विदयुत रोषणाई, रंगरांगोटी व रांगोळी करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासूनच गावागावातील मंदिरामध्ये धार्मिक विधी व पूजा आर्चा करुन सुरुवात करण्यात आली. तर महाआरती करण्यात आली. या महाआरतीत गावातील नागरीक सहभागी झाले होते.
वैभववाडी येथील संभाजी चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीत उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,युवासेना जिल्हा सचिव स्वप्निल धुरी,दिगंबर पाटील,  संदीप सरवणकर,श्रीराम शिंगरे, सूनिल रावराणे, शिवाजी राणे, यशवंत गव्हाणकर, राजा गडकर  यांच्यासह शिवसैनिकांसह नागरीक सहभागी झाले होते.

श्री राम मंदिर मुर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे श्री दत्त मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. अयोध्या येथे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विधीवत धार्मिक कार्यक्रम पहाण्यासाठी येथील दत्त मंदिरात लाईव्ह प्रक्षेपण लावण्यात आले होते. सदर कार्यक्रम पहाण्यासाठी आ. नितेश राणे शहरातील राम भक्त व नागरिकांमध्ये सहभागी झाले होते.
वैभववाडी येथील श्री राम उत्सव समिती व शहरवासीय यांच्या वतीने श्री. दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, सज्जनकाका रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, व्यापारी मंडळ अध्यक्ष तेजस आंबेकर, श्री. धावले, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, सुनील भोगले, श्री. मसूरकर, प्राची तावडे, यामीनी वळवी, स्नेहलता चोरगे, सुंदरी निकम, संगीता चव्हाण, संतोष टक्के, संजय लोके, मारुती मोहिते, प्रकाश माईणकर, दीपक माईणकर व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.