अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पुजा !

0

महेश इंगळेंच्या हस्ते श्रीरामांना पंचामृत दुग्धाभिषेक

मालोजीराजे भोसले राजासाहेब, आ.सचिन कल्याणशेट्टींच्या हस्ते मंगल आरती संपन्न

मान्यवरांचा व कारसेवकांचा महेश इंगळेंच्या हस्ते सत्कार

मसुरे,दि.२२ जानेवारी (झुंजार पेडणेकर)

अयोध्यातील ऐतिहासिक नुतन श्रीराम मंदिरातील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदीरातही प्रभू श्रीरामांच्या मंगल आरतीने श्रीरामांची उपासना अत्यंत भक्तीभावात पार पडली.
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व श्रीराम मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक, रामनाम जप, सत्संग महिला भजनी मंडळाची भजन सेवा, शास्त्रीय गायन, प्रसाद वाटप, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रम भक्ती भावात संपन्न झाले. सकाळी ६ वाजता श्रीराम मंदीरात श्रीरामांना पंचामृताने महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांच्या वतीने श्रीराम नामाचे सामुहीक जप करण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महीला भजनी मंडळाची भजनसेवा संपन्न झाली. दुपारी १२ :२० ते १२:२९ च्या मुहूर्तावर अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब, आ.सचिनदादा कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्रींची मंगल आरती संपन्न झाली. या प्रसंगी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेबांचा आ.कल्याणशेट्टींच्या हस्ते तर आ.सौ. व श्री.कल्याणशेट्टींचा महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थीत हजारो भाविकांना वटवृक्ष मंदीरात व श्रीराम मंदीरात मान्यवरांच्या हस्ते शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शहरातील मल्लीकार्जून मंदीर ते श्रीराम मंदीर अखेर आ.कल्याणशेट्टी व महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो श्रीराम भक्तांच्या सहभागाने भव्य पायी शोभायात्रा संपन्न झाली. सायंकाळी ७ वाजता सर्व मान्यवर व सर्व रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीराम मंदीरात हजारो दिव्यांच्या दिपप्रज्वलनाने दिपोत्सव साजरा करून या मंगल सोहळ्याची सांगता झाली. या संपूर्ण मंगलमय सोहळयात उपस्थित मान्यवरांसह आर.एस.एस. चे तालुका प्रमुख रवी जोशी, सदस्य दत्ता कटारे, संतोष वगाले, चेतन जाधव, नगरसेवक महेश हिंडोळे, उद्योगपती विलास कोरे, श्रीराम मंदीरातील सेवक गिरीश ग्रामोपाध्ये, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, पुरोहीत मनोहर देगावकर, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश लोणारी, मा.नगरसेवक रामचंद्र समाणे, मनोज शिंपी, बंडोपंत घाटगे, शशिकांत सलबते, निंगूताई हिंडोळे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, सुरेखा पाटील, लता काळे, विजया सोनटक्के, हेमा गवळी, नंदा कटारे, प्रा.शिवशरण अचलेर, अरविंद पाटील, स्वामीनाथ लोणारी, कांत झिपरे, प्रसन्न हत्ते, संतोष जमगे, शिवानंद कार्ले, शिवशरण इचगे, अरुण शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, किरण किरात, सुनिल पवार, मल्लीनाथ गवंडी, आशिष हुंबे, सिध्दाराम जोजन आदींसह अन्य कार्यसेवक व रामभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.