*
*श्री देव राधकृष्ण मंदिरात 3000 दिव्याचा दीपोत्सव साजरा करत महाआरती*
फोंडाघाट,दि.२२ जानेवारी (संजय सावंत)
अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभर सर्व मंदिरांमध्ये आनंदोत्सव साजरा होत असताना आज फोंडाघाट गाव सुद्धा रामनामाने,जय श्री रामाच्या जयघोषाने भक्तीमय बनला होता. फोंडाघाट मधील श्री देव राधाकृष्ण मंदिर,साईमंदिर सहित सर्व विविध मंदिरांमध्ये सकाळी प्रभू श्रीराम यांचे पूजन त्यानंतर राम नाम जप, भजन, कीर्तन, आरती, महाप्रसाद, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फोंडाघाट च्या भाविकांचे आराध्य असणाऱ्या श्री देव राधाकृष्ण मंदिर पुष्पहार व विदयुत रोषणाई ने सजविण्यात आले होते.तर सायंकाळी मंदिरामध्ये 3000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करत महाआरती करण्यात आली .
अयोध्या येथे रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठनेनिमित्त फोंडाघाट च्या श्री देव राधाकृष्ण मंदिर,साईमंदिर,मारुती मंदिर,गांगो मंदीर ,माऊली मंदिर,पावनादेवी मंदिर अशा विविध सर्वच मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम,राम नाम जप,भजन, कीर्तन,आरती,महाप्रसाद आदी कार्यक्रम साजरे करत दिवसभर सर्वत्र जय श्री रामाचा जयघोष होत असल्याने फोंडाघाट चा संपूर्ण परिसर राम मय झाला होता. यानिमित्ताने फोंडाघाट एसटी स्टँडवर समर्थ लोणचे यांचेतर्फे श्री.शांतादुर्गा आर्टस चे श्री. सशांक गाड यांनी १० फुट x २० फुट एवढी मोठी सकारलेली रांगोळी सर्व राम भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. तर सायंकाळी फोंडाघाट मधील सर्व महिला पुरुष नागरिकांनी एकत्र येत श्री देव राधाकृष्ण मंदिरात सुमारे 3000 पेक्षा जास्त दिवे लावत जय श्री रामाचे नाव दिव्यांनी कोरत आकर्षक रोषणाई करत दीपोत्सव साजरा केला व सर्वांनी एकत्रित महाआरती केली तसेच फाटक्यांची अतिशबाजी करत आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा उत्सव राम नामाचा जयघोष करत साजरा केला.यावेळी फोंडाघाट मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.