कणकवलीत १५ फुट उंच प्रभू श्रीरामांच्या मूर्ती समोर झाली महाआरती

आ.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली महाआरती

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी झाला.त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार नितेश राणे यांनी श्रीरामाची पंधरा फुटी उंच अशी मूर्ती उभारली आहे. या ठिकाणी आमदार नितेश राणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी ‘जय श्री राम , प्रभू रामचंद्र की जय’ असा जयघोष उपस्थित जनसमुदायाने केला.त्यामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते.
यावेळी आमदार नितेश राणे, यांच्या समवेत माजी आ. प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार,जि. प. अध्यक्ष संदेश सावंत,संघाचे जिल्हा कार्यवाह लवु म्हाडेश्वर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,प्रकाश गोगटे माजी. जि. प. उपाध्यक्ष सदा ओगले, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, युवा मोर्चा अध्यक्ष सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,आशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, प्रज्ञा ढवण, वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अयोध्या प्रभू श्री रामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कार सेवकांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.