वैभववाडी,दि.२३ जानेवारी
अयोध्या येथे होणाऱ्या राम लल्ला प्राणप्रतिष्ठान निमित्त तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .प्रथम पारितोषिका 2024/- विजेते – नागेश्री बेनारे,द्वितीय पारितोषिक 1024/- विजेते – वैभवी शेळके, उत्कर्षा चढवलं,व तीन उत्तेजनार्थ 524/- विजेते – सुशिमिता चोरगे,पूनम भोसले,प्रगती तावडे यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, नगराध्यक्ष नेहा माईणकर,सज्जन काका रावराणे,शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख विश्राम राणे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे,नगरसेविका यामिनी वळवी,भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या कदम,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले,अमित कोंदुळकर,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संकेत सावंत,अनंत पवार,राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस अजित शिंदे,सचिव अक्षय पंडित,खजिनदार अमोल आमकर,विद्या पाटील,गणेश पवार,राज तळेकर आदी उपस्थित होते.