सावंतवाडी,दि.२३ जानेवारी
वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदीरात श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित दिनांक 22 रोजी दिवसभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यासाठी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई तसेच सजावट करण्यात आली होती. सकाळी गुढी पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्रीराम भक्त श्री हनुमान चरणी अभिषेक , श्री राम नाम जप, राम रक्षा वाचन, राम स्तुती आदी कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा कऱण्यात आला. तसेच वैश्यवाडा परिसरात घरोघरी दीपोत्सव करण्यात आला. यानिमित्ताने अयोध्या येथील श्रीराम मंदिर होण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेले बंड्या सुकी यांचा हनुमान मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. गणेश दीक्षित यांच्या पौरोहित्य खाली हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.रोहिणी बांदेकर यांच्या मार्गदर्शना खाली नाम जप, रामरक्षा वाचनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात वैश्यवाडा व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने व उत्साहाने दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.