दाजीपूर उगवाई मंदिर येथे फोंडाघाट च्या पिकअप गाडीला अपघात

फोंडाघाट,दि.२३ जानेवारी(संजय सावंत)
कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर मधील उगवाई मंदिर याठिकाणी वनभोजनासाठी गेलेल्या फोंडाघाट येथील महिंद्रा पिकअप वाहनाला अपघात होऊन दोन जन किरकोळ जखमी तर तीन जणांना गांभीर दुखापत झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे पौश महिन्यामध्ये फोंडाघाट मधील काही महिलांचा दाजीपूर मधील उगवाई मंदिर येथे जाऊन जेवण करून वनभोजन करण्याचा कार्यक्रम होता याकरिता फोंडाघाट मधील दोन वाहनानं मधून महिलांचा ग्रुप मंदिर परिसरामध्ये पोहोचल्या .मात्र त्यामधील पिकअप महिंद्रा गाडीतील महिला उतरण्यापूर्वी वाहन चालक गाडी चा हॅन्ड ब्रेक उधून खाली उतरला मात्र तीव्र उतार असल्याने गाडी उताराणे मागे जाऊन एका झाडाला आदळली यामध्ये पिकअप गाडीतील काही महिला बाहेर फेकल्या गेल्या त्यामध्ये तीन महिलांना गभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील नवागुळ हॉस्पिटल येथे हळविण्यात आले असून दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या फोंडाघाट येथील प्राथमिक रुग्णालय याठिकाणी प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान झालेल्या अपघाताची गंभीरता पाहता या महिलांचे नशीब बलवत्तर होते म्हणून पिकअप गाडी झाडाला आदलून अडकून राहिली म्हणून अन्यथा किमान दहा फुट खोल नदीचे पात्र होते त्यात कोसळली असती तर अपघाताची गंभीरता वाढली असती.