वैभववाडी नगरपंचायत नगरसेविका दर्शना पवार,माजी
नगराध्यक्ष संजय चव्हाण, दीपा गजोबार यांच्यासह शकडो कार्यकर्ते भाजपात
कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी नगरपंचायत नगरसेविका दर्शना पवार, माजी नगराध्यक्षा दीपा गजोबार,माजी
नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह शकडो कार्यकर्त्यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.या सर्वांनी मुंबईत जाऊन शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता,त्यांनी राणेंच्या नेतृत्वात काम करायचे आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कट्टर शिवसैनिक म्हणून ना.नारायण राणे यांनी काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त आम्ही उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रवेशाची परतफेड केली पाहिजे असल्याची प्रतिक्रिया आ.नितेश राणे यांनी दिली.
तसेच वैभववाडी शहराच्या विकासात आणि सामाजिक वाटचालीत एक विधायक दृष्टिकोन ठेवून या सर्वांनी प्रवेश केलेला आहे.येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात वैभववाडीचा विकास साधण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत,आ.नितेश राणे म्हणाले.
यावेळी आ.नितेश राणे यांनी नगरसेविका दर्शना संतोष पवार,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण,माजी नगरसेवक संतोष पवार ,माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, दीपक गजोबार, आदित्य चव्हाण, रवींद्र तांबे ,राजेंद्र गजोबार, श्रेयस नेवरेकर, उत्तम निकम आदींसह शेकडो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी भाजपचे वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी,जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे,बँक संचालक दिलीप रावराणे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.