कणकवली दि.२३जाने.(भगवान लोके)
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुका प्रमुख शैलेश भोगले, शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, योगेश मुंज, तेजस राणे, महेश कोदे, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, विलास गुडेकर, राजू राठोड, सह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.