शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

णकवली दि.२३जाने.(भगवान लोके)

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज कणकवली शिवसेना शाखा कणकवली येथे साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन कऱण्यात आले. यावेळी अमर रहे.. अमर रहे.. बाळासाहेब अमर रहे..आदी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, महेंद्र सावंत, तालुका प्रमुख भूषण परुळेकर, महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, जिल्हा समन्वयक सुनील पारकर, दामू सावंत, कलमठ शहर प्रशांत वनसकर, चिन्मय रावराणे, निलेश तेली, विवेक एकावडे, बाबू आचरेकर, विश्राम सावंत, बाळा गुरव, पांडुरंग मेस्त्री उपस्थीत होते.