भगवं वस्त्र परिधान करत, रुद्राक्ष माळ घालून एक बहुरुपी फिरला

आमदार नितेश राणे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका;बाळासाहेब असते तर त्यांनी “शाब्बास मोदीजी” अशी “सामना” वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन दिली असती…

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना बाळासाहेबां सारखा कडवट आणि प्रकट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशांमध्ये कधी झाला नव्हता.आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.अयोध्येमध्ये काल भव्य असं राम मंदिर उभं राहिलं, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. ते पाहिल्यानंतर जर आज “बाळासाहेब” असते तर त्यांनी “शाब्बास मोदीजी” अशी “सामना” वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन दिली असती. त्यांचे ते हिंदुत्ववादी विचार होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाही . “हृदयात राम आणि हाताला काम” अस मोठं घोष वाक्य सांगतायत. खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उबाठाच घोष वाक्य” हृदयात खान आणि हाताला हात म्हणजे कॉग्रेसचा हात “हे त्याचं खऱ्या अर्थाने घोष वाक्य आहे,अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आज जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

काल नाशिक मध्ये भगवं वस्त्र परिधान करून आणि रुद्राक्ष माळ घालून एक बहेरूपीय आपल्या कुटुंबीयांबरोबर फिरत होता. स्वतः बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा ठोगी पणा करायचा. आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला की माझ्या शिवसेनेचा कधीही काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेब नेहमी सांगत असायचे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पायावर संपूर्ण पक्ष ठेवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं.काल नाशिक मध्ये गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ आणि भगवं वस्त्र परिधान करून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कस असतात याचं उत्तम उदाहरण नाशिकच्या काल रोडवर पाहायला मिळाला.

एका जवळच्या शिवसैनिकानी काल सांगितलं की,नितेश उद्धव ठाकरे यांना विचारा की, बाळासाहेब रुद्राक्ष माळ घालायचे ती नेमकी कुठे आहे.मातोश्री मध्ये आहे की कुठे फेकून दिली.याच उत्तर देण्याच धाडस उद्धव ठाकरे यांनी कुटुंबिय करणार आहेत का? सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट बोलण्यापासून लाज वाटायची तसेच बॅनर वर फोटो लावण्याचं बंद करून टाकलं आणि आज पक्ष रसातळाला गेले तेव्हा बाळासाहेबांची आठवण आणि बाळासाहेबांसारखं दिसण्याचा प्रयत्न हे बहिरूपी करतायेत हे डुप्लिकेट चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी करतायेत असा टोला नितेश राणे यांनी लगावला.