वेताळ करंडक पुनश्च न्यू इंग्लिश स्कूल, वेंगुर्ले उभादांडा हायस्कूल कडे

वेंगुर्ले ,दि.२३ जानेवारी

प्रतिवर्षी प्रमाणे वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित अश्वमेध महोत्सव नुकताच तूळस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या वर्षी हि सर्वोत्तम कामगिरी करत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले या प्रशालेने सलग दुसऱ्या वर्षी वेताळ प्रतिष्ठानच्या मानाच्या वेताळ चॅम्पियनशिप मिळवत अनेक स्पर्धांमध्ये हि बाजी मारली.
या अश्वमेध महोत्सवात मॅरेथॉन स्पर्धेत मुलींच्या गटात आठवीच्या अलिषा सुरेश कुबल आणि नववीच्या खुशी धनंजय गिरप ने बाजी मारत यश मिळवलं
तर रांगोळी स्पर्धा चमकदार कामगिरी करताना निधी यशवंत पेडणेकर तर वैष्णवी राजाराम कोचरेकर हिने नंबर मिळवला.
दशावतार सभिनय स्पर्धेत दहावीच्या विर नारायण गावडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी आपल्या प्रथम क्रमांकाची पंरपरा अबाधित राखत सलग दुसऱ्या वर्षी हि दशावतार अभिनय स्पर्धत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
निबंध स्पर्धेत सातत्याने जिल्हा स्तरावर यशस्वी होणारी कु.गायत्री लक्ष्मण वरगावकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर या वर्षी घेण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर तर मराठी वक्तृत्व स्पर्धेत साक्षी महेश तुळसकर हिने बाजी मारली.
प्रश्नमंजुषा स्पर्धत दिपक राजाराम साळगावकर आणि दिपेश जयराम वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला
तर समुह नृत्य स्पर्धेतही
व्दितीय क्रमांक प्राप्त झाला यात साक्षी तुळसकर,वैष्णवी कोचरेकर,खुशी गिरप,जिया साळगावकर,स्नेहा वेंगुर्लेकर, वैष्णवी तांडेल,मेघा मयेकर, गायत्री कुऱ्हाडे,दिव्या पेडणेकर, महिमा नार्वेकर यांचा सहभाग होता तर
समुह गान स्पर्धेसाठी या प्रशालेचे निवृत्त अध्यापक श्री कुबल सर यांनी विशेष परिश्रम घेतले या समुह गानसाठी हार्मोनियम वादक म्हणून कुबल सर तबलावादक म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी आकाश नाईक यांनी साथसंगत केली तर ताल रक्षक नैतिक नाईक यांनी योगदान दिले यात या प्रशालेच्या
स्नेहा वेंगुर्लेकर, वैष्णवी तांडेल,दिव्या पेडणेकर,जिया साळगावकर,नेहा साळगावकर, वैष्णवी कोचरेकर,साक्षी तुळसकर,रिया साळगावकर ,अमृता नवार,मेघा मयेकर
यांनी सहभाग घेत
देदीप्यमान कामगिरी करत प्रतिष्ठेचा वेताळ करंडक सलग दुसऱ्या वर्षी हि निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेने पटकावला
मराठी वक्तृत्व,निंबध, मॅरेथॉन, रांगोळी,या साठी या प्रशालेचे उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
समुह नृत्य स्पर्धसाठी या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी शरयु गोसावी आणि सिध्दी गोसावी हिने नृत्याचे विशेष मार्गदर्शन केले
त्याच बरोबर जेष्ठ अध्यापिका मोहिते मॅडम, भिसे मॅडम यांनी हि नृत्य स्पर्धा आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
दशावतार स्पर्धे साठी लौकिक प्राप्त दशावतार कलावंत नटश्रेष्ठ पप्पू नादोसकर यांनी रंगभुषा, वेशभूषा आणि अभिनय या साठी विनामोबदला मार्गदर्शन केले तर प्रश्न मंजुषा स्पर्धे सोबतच समुह गान स्पर्धसाठी सौ.कुबल मॅडम याचे
हि मार्गदर्शन लाभले.
या सर्व स्पर्धकांना
बोडेकर सर , अंधारी मॅडम यांनी हि मार्गदर्शन केले तर प्रशालेचे शिपाई दिलीप गोठसकर यांनी सर्वोपतोरी सहकार्य करून या यशात महत्त्वाचे योगदान दिले .
या उल्लेखनीय यशात न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक
उमेश वाळवेकर यांचे हि विशेष मार्गदर्शन लाभले असुन संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या यशस्वी विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक,मार्गदर्शक सौ. मोहिते मॅडम,सौ भिसे मॅडम,सौ.कुबल मॅडम,बोडेकर सर, अंधारी मॅडम, श्री.खानोलकर सर लिपिक श्री अजित केरकर, दिलीप गोठसकर काका, तसेच निवृत्त होऊन सुध्दा मार्ग दर्शन करणारे कुबल सर, गोवेकर सर, वाळवेकर मॅडम शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा नृत्य दिग्दर्शक शरयु गोसावी, दशावतार कलावंत पप्पू नादोसकर आणि सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व सर्व शिक्षक यांचे हि विशेष अभिनंदन केले.
सलग दुसऱ्या वर्षी वेताळ प्रतिष्ठान आयोजित विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून प्रतिष्ठेचा वेताळ करंडक पटकावणाऱ्या या प्रशालेच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे