वायरी गर्देरोड येथील रहिवासी कु. संध्या पाटकर यांचे निधन

मालवण,दि.२३ जानेवारी

मालवण शहरातील वायरी गर्देरोड येथील रहिवासी कुमारी संध्या जनार्दन पाटकर ( वय ५२ ) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.

संध्या पाटकर या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, वहिनी, आते, भाचे असा परिवार आहे. मालवण आगाराचे सेवानिवृत्त चालक आत्माराम पाटकर व मालवण एसटी स्टॅंड येथील रिक्षा व्यावसायिक रमेश पाटकर यांची तसेच मंदा पाटकर यांची बहीण आणि सेवानिवृत्त शिक्षिका कमल पाटकर यांची ती भाची होय.