जय श्रीरामचा जयघोष ; अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला आल्याचा आनंदोत्सव
कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)
कलमठ बिडयेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला आल्याचा आनंदोत्सव करण्यात आला.त्या निमित्ताने जय श्रीरामचा जयघोष करीत गणेश मंदिरात ग्रामस्थांच्यावतीने ११११ पणत्या प्रज्वलित करीत दिपोत्सव साजरा करण्यात आला.
अयोध्येत राम मंदिर उद्घाटन व प्रभू श्री रामांच्या नूतन मुर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कलमठ बिडयेवाडी ग्रामस्थांच्या वतीने २२ जानेवारी २०२३ रोजी गणेश मंदिरात अभिषेक पूजा,महाआरती,दुपारी महाप्रसाद ,दिपोत्सव केला.त्यानंतर सुस्वर भजन करीत फटाक्यांची आतिषबाजी बाजी करत आनंदोत्सव करण्यात आला.