खेळात खिलाडूवृत्ती दाखवून खेळाचीही उंची वाढवा-भूपेश राणे

तोंडवली येथे नर्सिंग कॉलेज क्रिडा महोत्सव

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

खेळात शिस्त आणि फिटनेसला खुप महत्व आहे.त्याचप्रमाणे खेळात खिलाडूवृत्ती दाखवून आपल्या बरोबर खेळाचीही उंची वाढवा असे प्रतिपादन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कबड्डी निवड समिती चेअरमन भूपेश राणे यांनी दिले.ते नर्सिंग कॉलेज तोंडवली येथे क्रिडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात यावेळी नर्सिंग प्राचार्या शकुंतला नागराज, संस्था प्रतिनिधी विनायक चव्हाण, शिक्षक सागर भोसले, विद्याधर तांबे, जयेश मोचेमोडकर, सुप्रिया मामजी, श्रीमंत खरात,स्वप्नील सुळ, कविता सावंत, प्रिती नाईक, सुधाकर जाधव, सुष्टि कांजी, लखन चव्हाण, रोहिणी सावंत, दिपीका गोसावी, दिपाली बेले, धनश्री हरकुळकर,मिताली पराडकर आदी उपस्थित होते.
यावेळी विनायक चव्हाण, प्राचार्या शकुंतला नागराज यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना शपथ देऊन मैदानावर पुजा करून सामन्यांना सुरवात करण्यात आली.