आशिये येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त मोटारसायकल रॅली

कणकवली दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त आशिये गावातील युवा वर्गाच्या वतीने आशिये गावात आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली. श्री दत्तमंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. तेथून बाणेवाडी मार्गे गांगोभैरी मंदिरात दर्शन घेऊन खालचीवाडी, टेंबवाडी, बाणेवाडी ते वरचीवाडी नंतर ठाकूरवाडी ते ओमनगर येथून पुन्हा दत्तमंदिर पर्यंत ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीत आशिये गावातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय श्री राम, प्रभू श्री रामचंद्र की जय! अयोध्या पति श्री रामचंद्र की जय अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.