अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त वायरी गर्देरोड येथील महापुरुष मंदिरात विद्युत रोषणाई

मालवण,दि.२३ जानेवारी

अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याच पार्शवभूमीवर वायरी गर्देरोड येथील महापुरुष मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच राम गीतांनी वातावरण भक्तिमय बनले. सायंकाळी दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथील महापुरुष मित्रमंडळ वायरी गर्देरोड युवक मंडळ, ग्रामस्थ आणि महिला यांच्या वतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.